मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०११


तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा   .
हि दिवाळी सर्वाना आनंदाची, सुखाची आणि भरभराटीची जावो .

सोमवार, ५ सप्टेंबर, २०११

स्वप्नातल्या जगात
मनातल्या गोष्टी दिसतात
काही घडलेल्या
काही न घडलेल्या
काही घडव्याश्या वाटणर्‍या

स्वप्नात असतात
प्रिय अप्रिय सगे सोयरे
कधी कधी आपणच असतो
आपल्या स्वप्नातले पाहुणे

कधी करतो प्रेम 
कधी भांडण
कधी करतो गोष्टी
कुणाला न 
सांगाव्याश्या वाटणार्‍या

कधी स्वप्न अचानक
संपुन जाते
आणि जाग येते
आपण समजावु
पहतो अर्थ मनाला
पण वेडे मन ते 
ते  स्वप्नातच दंग रहाते

काही गोष्टी कधीच समजत नाही

अशक्य पाणचट @ http://www.facebook.com/


हरभजन चे ४०० विकेट्स,



आफ्रिदी चे ३१ वय










आणि शरद पवारांची १२ करोड ची संपत्ती....:D

सोमवार, २९ ऑगस्ट, २०११

गडबड

माझ्या मना बन दगड
लवकर दार उघड
दारात उभे माकड
गच्चीत राहिले पापड
आहे वाट अवघड
आठव तो सिंहगड
कशी चढली घोरपड
पारम्ब्याशिवाय वड
हात झाले जड
थांबव हि धडपड
हे काव्यच आहे गडबड.

शनिवार, २० ऑगस्ट, २०११

शरद पवार,राजा ,कलमाड़ी आणि १२५ कोटि सुखी भारतीय.



एकदा शरद पवार,राजा आणि कलमाड़ी हेलिकॉप्टर मधून प्रवास करत होते

पवार १००रु.ची नोट खाली टाकतात.आणि म्हणतात..

"मी एका गरीब भारतीयाला सुखी केले"
.........
मग राजा ५०रु च्या दोन नोट टाकतात आणि म्हणतात..

"मी दोने गरीब भारतीयाना सुखी केले"

मग कलमाड़ी १रु च्या १००नाणी टाकतो आणि म्हणतात..

"मी १००गरीब भारतीयाना सुखी केले"

हे ऐकून पायलट म्हणतो
"मी तुम्हा तिघाना टाकुन देईन आणि १२५कोटि भारतीयाना निरंतर सुखी करेन"
आणि ते पायलट होते

"आपले अण्णा हजारे*.

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०११

साधेपणा, टोपी, चष्मा, लाठी आणि बापू

एकदा सोनियाजींच्या स्वप्नात बापू आले.
"मी मरताना कॉंग्रेसला साधेपणा, टोपी, चष्मा आणि लाठी दिली होती. आता कुठे आहेत?
सोनियाजींनी अत्यंत विनम्रतेने सांगितले,
"टोपी राहुल लोकाना घालत आहे,
साधेपणा माझ्या आणि प्रियंका कडे आहे,
चष्मा मनमोहन कडे आहे,
आणि लाठी सामान्य लोकांच्या सेवेमध्ये आहे."