समर्थ सांगुन गेलेत दिसामाजी काहीतरी लिहावे. तशी मुर्खांची लक्षणेसुद्धा सांगितली आहेत , त्यात आमचे लिखाण आपण सामील करू नये हीच नम्र विनंती
Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मंगळवार, १६ ऑगस्ट, २०११
दाऊद ,कसाब , लालू , कलमाडी , येद्द्युराप्पा ,अण्णा आणि बाबा
दहशतवाद :मुंबई : १९९३ : १८ वर्षे : दाऊद : शिक्षा नाही
संसद : २००१ : १० वर्षे : अफजल गुरु : शिक्षा नाही
अक्षरधाम: २००२ : ८ वर्षे : ?? : शिक्षा नाही
मुंबई : २००२ -२००३ : ८ वर्षे : ?? : शिक्षा नाही
दिल्ली-अयोध्या : २००५ -२००६ : ६ वर्षे : ?? : शिक्षा नाही
मुंबई -वाराणसी : २००६ : ५ वर्षे : ?? : शिक्षा नाही
मुंबई हल्ला : अजमल कसाब : २ वर्षे : शिक्षा नाही
भ्रष्टाचार:
हसन अली: :३००,०००,००० रुपयेचारा : ९००,०००,००० रुपये
बोफोर्स :६४,०००,००० रुपये
हवाला :७२,०००,००० रुपये
केतन पारेख : १,०००,०००,००० रुपये
हर्षद मेहता : ४,०००,०००,००० रुपये
सत्यम : १४,०००,०००,००० रुपये
तेलघी : २०,०००,०००,००० रुपये
राष्ट्कुल स्पर्धा : ७०,०००,०००,००० रुपये
2G स्पेक्ट्रम : १७६,०००,०००,००० रुपये
आणि शहीद जवानांच्या शवपेटिका , बेकायदा भूखंड, झोपडपट्टी , आदर्श , खाण उत्खनन वगैरे वगैरे ....
लालू , कलमाडी , येद्द्युराप्पा , राजू , जयललिता , मायावती , मोडी , थरूर
कधी ऐकलय कुणाला शिक्षा झाली आहे आणि तो तुरुंगात गेलाय ?
आपल्या देशाच्या संसदेतल्या प्रतिनिधीपैकी १०% पेक्षा अधिक जणांवर खटले नोंदवले गेले आहेत!!
आणि सरकारने अण्णा हजारे , रामदेव बाबा ह्यांच्या वर २ तासात कारवाई करून दाखवली काय हि तत्परता? रविवार, १४ ऑगस्ट, २०११
खून , चोरी , दरोडे , अत्याचार , भ्रष्टाचार , घोटाळा आणि मी
१५ ऑगस्टला मी सकाळी लवकर उठतो
तोंड धुवायच्या आधी म्यूसिक सिस्टमवर "मेरे देश कि धरती" मोठ्याने वाजवतो.
कमोडवर बसल्याबसल्या देशभक्तीचे SMS फोरवर्ड करतो.
आंघोळ करून पांढरा झाबा झळकवत झेंड्याला सलाम ठोकतो.
इमेल फोरवर्ड करून झाल्यावर
फेसबुकवर जयहिंद, वंदे मातरम लिहून स्टेटस अपडेट करतो.
इतकं करून समाधान होत नाही म्हणून ,
भारत , हिंदुस्तान , आय लव इंडिया अश्या पेजला विझिट देतो.
अण्णा आणि रामदेव बाबांच्या पेजवर कमेंटसुद्धा करतो.
पेपरात खून , चोरी , दरोडे , अत्याचार,भ्रष्टाचार
एकाच पानावर , मी दुर्लक्ष करतो,
चारा घोटाळा, टेलिकॉम घोटाळा,खाण घोटाळा, आदर्श घोटाळा
ह्या लोकांना कंटाळा कसा येत नाही ?
मग एखाद्या बातमीखाली कडक शब्दात प्रतिक्रिया नोंदवतो.
लायसेन्स नाही म्हणून पोलिसांनी अडवल्यावर मात्र
गांधीजीना पुढे करून गुपचूप सटकतो.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
